YouTube Video Carousel

धोनी कप्तान असलेल्या चेन्नई सुपर किंगच्या व्यक्तीने केला शहीदांचा अपमान

भारत चीन दरम्यान सध्या सुरु असलेल्या चकमकीत  भारताचे जवळपास २0 जवान शहीद झाले असतांना , या घटनेबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी डॉ. मधु थोत्तापिल्लील या चेन्नई सुपर किंगच्या डॉक्टर ची  हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याने आपल्या ट्वीट मध्ये ' मला जाणून घेण्याची उत्सुक्तता आहे कि, शहीद जवानांच्या पेटीवर 'पी एम केयर चे स्टिकर लावेलेले असेल का ?.' यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याची हकालपट्टी केली .

पंतप्रधान मोदींवर टीका करणारे भरपूर लोक आहेत, या देशात अभिव्यक्ती स्वतंत्र असले तरी , अशा प्रकारे 'शहीदांचा' अपमान करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही , अश्या गोष्टी आमच्या जिव्हारी लागतात , मालेगाव लाइव अश्या प्रवृत्तींचा जाहीर निषेध करते !
Previous Post Next Post