*देशात सलग सहाव्या दिवशी ९ हजारांहून अधिक रुग्ण*
गेल्या २४ तासांत देशात ९,९८३ रुग्ण आढळले असून, *एकूण रुग्णसंख्या २ लाख ५६ हजार ६११ वर पोहोचली आहे.* देशभरात आतापर्यंत १ लाख २४ हजार ९५ रुग्ण बरे झाले आहेत.
*राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2553 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 88,528 आहे.*
दिवसभरात सर्वाधिक 109 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
*महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे- राजनाथ सिंह*
महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे अशी टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. करोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते चांगलं नाही असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.
*पेट्रोल डिझेलवर नको, दारुवर कर वाढवा- मनसे*
देशात पेट्रोल-डिझेलचे दर हे इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत. त्यात हा अधिभार नको. त्यामुळे महागाई वाढेल. सरकारने याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत आणि त्यात हा अधिभार, असं मनसेनं म्हटलं आहे..
*दिवसभरात नाशिक जिल्ह्यात 40 नवे कोरोनाबाधित रुग्णाची नोंद, तर दोघांचा मृत्यू,* मालेगावात 20, नाशिक शहर 16 तर नाशिक ग्रामीणमध्ये 4 रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1613 तर 1066 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 99 मृत्यू
*तर चीनला धडा शिकवू-भारतीय व्यापारी संघटनेचा पवित्रा*
छोट्या व्यापाऱ्यांच्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं चीनच्या आव्हानाचा स्वीकार केला आहे. देशातील व्यापारी आणि नागरिक मिळून चीनी मालावर बहिष्कार टाकून ते यशस्वी करून दाखवू असा प्रतिइशारा भारताच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे.