YouTube Video Carousel

खुशखबर: ग्लेनमार्कच्या फॅबीफ्ल्यू ला भारतात कोरोनाव्हायरस उपचारांसाठी मंजूरी

आघाडीची औषध निर्माण कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ला भारतीय औषध नियामक ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मान्यता मिळाल्यानंतर सौम्य ते मध्यम कोविड-१९ रूग्णांच्या उपचारासाठी अँटीव्हायरल औषध सादर करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे .

कोविड -१९ वरील उपचारासाठी फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. हे औषध कोविड-१९ च्या रूग्णांसाठी आहे. तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असतील अशा रूग्णांच्या उपचाराकरता हे औषध वापरले जाईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी सांगितले आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने म्हटले आहे की फॅबीफ्लू या ब्रॅण्ड नावाच्या औषधाची फॅव्हीपिरवीर 34 टॅब्लेटच्या पट्टीसाठी जास्तीत जास्त रिटेल प्राइस (एमआरपी) १०३ रुपये प्रति टॅबलेट म्हणून उपलब्ध होईल.
Previous Post Next Post