YouTube Video Carousel

मालेगांव तालुका शेतकरी सहकारी संघ लि. येथे किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत मका, ज्वारी, बाजरी व रागी या भरडधान्यांची खरेदी

मालेगाव:- मालेगांव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मालेगांव तालुका शेतकरी सहकारी संघ लि. येथे  किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत मका, ज्वारी, बाजरी व रागी  या भरडधान्यांची खरेदी शासकीय आधारभूत किंमतीत सुरू करित असल्याची माहिती मुंबई व मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक, नाशिक जिल्हा कृषी औद्यीगिक सहकारी संघाचे चेअरमन, युवा नेते
मा. डॉ.अद्वयआबा हिरे-पाटील  यांनी प्रसिद्धी नोट द्वारे दिली आहे.
     सोमवार, दि. १८ मे २०२० पासून शेतकरी सह. संघ मालेगांव येथे किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत मका, ज्वारी, बाजरी व रागी या भरड धान्याची खरेदी शासकीय आधारभूत किंमतीत सुरू करण्यात येत आहे, याचा लाभ मालेगांव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी घ्यावा असे आवाहन शेतकरी संघाचे संवर्धक, युवा नेते मा. डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील यांनी केले  आहे.
     कोरोनाच्या संकट काळात सर्व जनतेसह शेतकरी बांधवानी विशेष काळजी घ्यावी, शेतकरी राजाने स्वतःची काळजी घेत भरड धान्य नोंदणी साठी येताना आधारकार्ड, ७/१२ उतारा, बँकेचे पासबुक आदींच्या झेरॉक्स आणाव्यात असेही आवाहन डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील यांनी केले आहे.
          सदर योजना ३०जून २०२० पर्यंतच सुरू राहणार आहे.
Previous Post Next Post