YouTube Video Carousel

मालेगावहून जिवंत काडतुसे व बंदूक घेऊन निघालेल्या एकाला ओझर येथे पोलिसांनी पकडले

नाशिक, दि. २५ डिसेंबर २०२३
 आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांचे आदेशान्वये ग्रामीण पोलीसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे.

त्याअनुषंगाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनूसार मालेगाव शहरातून एका टॅक्सीमध्ये काही संशयीत घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगून नाशिकच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ओझर १० वा मैल परिसरात सापळा रचून संशयीत टॅक्सी क्र. एम.एच. १५.जी.व्ही. २७५८ हे वाहन अडवून, वाहनातील संशयीत नामे मोहम्मद आरिफ मोहम्मद फारूख, वय ३६, रा. रजियाबाद, मालेगाव, ता. मालेगाव याची झडती घेतली असता, त्याचे कब्जात एका बॅगमध्ये देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे मिळून आली. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचेविरूध्द ओझर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील तसेच विशेष पथकातील पोनि श्री. संजय गायकवाड, सपोउनि दिपक आहिरे, शांतराम नाठे, पोहवा सचिन धारणकर, चेतन संवत्सरकर, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर, नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अवैध व्यवसायविरोधी हेल्पलाईन कमांक ६२६२ २५ ६३६३ यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.
Previous Post Next Post