YouTube Video Carousel

अवैध पेट्रोल, डिझेलची साठवण आणि विक्री केल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव, ३१ ऑक्टोबर २०२३:  मालेगाव तालुका पोलिसांनी  झोडगे शिवारातील महामार्ग क्र. ३ लगत हॉटेल कृष्णाच्या पाठीमागे पत्र्यांचे खोल्यांलगत मोकळ्या जागेत अवैध पेट्रोल, डिझेलची साठवण आणि विक्री करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर भाऊसाहेब पाटील (२४ वर्षे), रोहित दादाभाऊ खामकर (१८ वर्षे ९ महिने), गणेश कृष्णा शेलार (१९ वर्षे), विक्रम सुरपाल राठोड (२५ वर्षे), विनोद चंद्रसेन कलमे (३८ वर्षे), प्रकाश गणेश मरांडी (२४ वर्षे) आणि परसराम भिका गवांदे उर्फ भल्ला शेठ (रा. झोडगे, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांनी संगनमत करून त्यांचे ताब्यातील लोखंडी व प्लॅस्टीकचे ड्रममध्ये ठरवून दिलेल्या अत्याआवश्यक पेट्रोल, डिझेल तसेच बायोडिझेल सदृश्य ज्वालाग्रही द्रव्य याचा साठा केला होता. त्यांनी वैदयमापन अधिकृत नसलेल्या नळीच्या सह्यायाने बाहेर काढून विना परवाना स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर रित्या कुठलीही सुरक्षात्मक उपाययोजना न करता पेट्रोल, डिझेल तसेच बायोडिझेल सदृश्य ज्वालाग्रही द्रव्याचा साठा आणि त्याचे विक्री साठी लागणारे साहित्य साधने बेकायदेशीर रित्या स्वतःच्या कब्जात बाळगून त्याचे अवैधरित्या विक्री करत होते.
सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आग प्रतिबंधक उपाययोजना केली नसल्याने ज्वालाग्रही पदार्थाच्या बाबततीत मानवी जीवीतास धोका होईल असे हयगयीचे वर्तन दिसून आले. तसेच आरोपी प्रकाश गणेश मरांडी याने अन्यायाने ट्रक मालकाचा विश्वासघात करुन त्याचे ताब्यात दिलेली ट्रक क्र. एम.एच.१२ व्ही. एफ १३४४ मघुन बेकायदेशीररित्या डिझेल काढुन आरोपी क्र. १ ते ५ व  आरोपी गवांदे यांना स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी हयगयीचे कृत्य करुन विक्री करत होते.
पोलिसांनी सदर कारवाई श्री. डॉ. बी.जी.शेखर, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे. सदर कारवाईत एकूण २०,१८,७४० रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७४८ /२०२३ भारतीय दंड सहिता कलम २८५, २८६,४०६,४०८,३३६,३४ तसेच अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous Post Next Post