YouTube Video Carousel

लव्ह जिहाद कायदा मंजूर : धर्म लपवून विवाह केल्यास ५ वर्षांची शिक्षा!

गुजरात : (तरुण भारत )गुजरातमध्ये आता लव्ह जिहाद कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. लव्ह जिहाद कायदा मंजूर झाल्याने आता जबरदस्ती, आमिष दाखवून किंवा विवाहाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडलं तर गुन्हा असणार आहे. या कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास आरोपीला १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.




धर्म लपवून विवाह केल्यास ५ वर्षांची शिक्षा आणि दोन लाखांचा दंड असणार आहे. तर अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास ७ वर्षांची तुरुंवास आणि ३ लाखांचा दंड करण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्याचबरोबर या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना ३ लाखांचा दंड आणि ७ वर्षाची शिक्षा असणार आहे.



गुजरातमध्ये १५ जून पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. धर्मांतर करण्याच्या हेतूने एखाद्या महिलेशी लग्न करून तिची फसवणूक रोखण्यासाठी हा कायदा संमत करण्यात आला आहे. या विधेयकात २००३ च्या कायद्यात संशोधन केलं गेलं आहे. त्यात जबरदस्तीने प्रलोभन देऊन धर्मांतरण करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.



हा निर्णय गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी घेतला होता. निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी हिंदू स्त्रीयावर आणि मुलीवर होणारे अत्याचार आम्ही रोखू असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी हा कायदा आणला आहे. त्यांनी हा कायदा गुजरातच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पास केला होता. त्यांनतर त्यांनी तो राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. तो राज्यपालांनी मान्य केला आहे.

Previous Post Next Post