YouTube Video Carousel

अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना होणार मोफत धान्याचे वितरण: तहसिलदार चंद्रजित राजपूत

मालेगाव, दि. 10 ( मालेगाव लाईव्ह  वृत्तसेवा): कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरच मोफत धान्याचे वितरण राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार चंद्रजित राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

तालुक्यात अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या 12 हजार 442 असून त्यांची सदस्य संख्या 52 हजार 230 आहे, तर प्राधान्य कुटूंबातील शिधापत्रिकांची संख्या 56 हजार 616 असून सदस्य संख्या 2 लाख 85 हजार 521 आहे.  या पात्र लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत लवकरच मोफत धान्याचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अंत्योदयच्या लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका 35 किलो धान्य मोफत मिळणार असून प्राधान्यच्या लाभार्थ्यांना प्रति सदस्य प्रमाणे 5 किलो  मोफत धान्याचा यात समावेश असणार आहे.

गोदामातील व सर्व रास्तभाव दुकानदार यांचेकडील सर्व प्रकारचे भरडधान्याचे पात्र लाभार्थ्यांना वाटप करणेपुर्वी अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत तपासणी करून अन्नधान्य खाण्यास योग्य असल्याची खात्री करून घेण्याच्या सुचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत खराब किंवा खाण्यास अयोग्य असलेले धान्य वाटप होणार नाही याची तहसिलदार यांनी स्वत: दक्षता घेण्याच्या सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या आहेत.
Previous Post Next Post