YouTube Video Carousel

बालकांच्या अनधिकृत दत्तक प्रक्रीयेबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

नाशिक दि. 06 मे 2021 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा): 
कोविड 19 महामारीच्या काळात बालकांना दत्तक घेणे व देणे याबाबत समाज माध्यमांवर विविध संदेश येत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही बालकाचे अनधिकृतपणे दत्तक देवाण - घेवाण होऊ नये यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या 0253-2236368 व 2236294 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्याप्रमाणे, केंद्रिय दत्तक ग्रहण प्रकिया मार्गदर्शिका 2017 नुसार बालक दत्तक घेण्याची अथवा देण्याची प्रकिया ही www.cara.nic.in संकेतस्थळावरूनच  करण्यात येते. कोविड महामारीच्या काळात बालकांचे आई व वडिल मयत झाल्याने बालके एकटी असतील अथवा दोन्ही पालक कोविड १९ चा उपचार घेत असतील व बालकांना सांभाळण्यास कोणी तयार नसेल अशा वेळी जिल्ह्याच्या बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल न्याय अधिनियमान्वये बालकांची काळजी घेणारी नोंदणीकृत संस्था, जवळचे पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधण्यात यावा. अशा बालकांच्या मदतसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत टोल फ्री क्रमांक 1098, 8308992222, 7400015518८ उपलब्ध केलेले आहेत.
कोणतेही बालक हे अनधिकृतपणे दत्तक दिले जाणार नाही याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. तसेच कोविड १९ मुळे आई वडिल मयत झालेले आहेत, बालकांना दत्तक देणे आहे अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिकच्या ०२५३-२२३६३६८/२२३६२९४ या कमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नाशिक यांनी केले आहे.

अनधिकृतरित्या बाळ दत्तक घेणे अथवा देणे हा बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व केंद्रिय दत्तक ग्रहण प्रकिया मार्गदर्शिका २०१७ नुसार दंडनीय अपराध आहे, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous Post Next Post