YouTube Video Carousel

महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार

*महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार*

👉🏻राजधानी दिल्ली मध्ये नुकताच ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीकडे राज्य सरकारचं लक्ष असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागू करण्याबाबत येत्या २ दिवसांत निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

✅ कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. अख्ख्या जगातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे सुरूवातीला कडक निर्बंधांना विरोध करणारे व्यापारीच आता राज्यात कडक लाॅकडाऊन लावा, अशी मागणी करू लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांचाच अंदाज चुकवला आहे. ही लाट सौम्य असेल, असं वाटत असताना ती अतिशय तीव्र स्वरूपाची आली आहे. या लाटेला थोपवून सर्वसामान्यांचा जीव वाचवणं यालाच सरकारचं प्राधान्य राहील. सरकारकडून त्यासाठी आवश्यक आरोग्याच्या सोई-सुविधाही उभारल्या जात आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

✅ दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांत कडक लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन मध्ये कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे, याची माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

✅ दरम्यान, राज्यात काल 68631 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3106828 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 670388 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92% झाले आहे.


Previous Post Next Post