मालेगाव (सचिन पगारे) महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या असून सर्वांना सरसकट पास केला जाणार आहे..
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोना ची लागण होताना दिसत आहे, अशा परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही आणि जर घेतल्या तर त्यातून निष्पन्न काही होणार नाही उगाचाच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालने चुकीचे असल्याने शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुलांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये त्याकरिता आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे,
सध्याच्या धोकेदायक वातावरणामुळे पालकांनीही या निर्णयाचे स्वागतच केले आहे..