कुकाने ( सचिन पगारे ) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा सादर केला
अनिल देशमुख यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं ज
यश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Bomb Scare), मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची उचलबांगडी झाली, त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत होता. आज मुंबई हायकोर्टाने हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवलं आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा दिला आहे.
(साभार : tv9 marathi )
