नंदुरबार (प्रतिनिधी) दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे अशातच हॉस्पिटल्स बेड्स ची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे आणि यावर उपाय म्हणून नंदुरबार येथे रेल्वेने रेल्वेच्या बोगी मध्ये विलगीकरण कक्ष सुरू केले आहे ज्यामुळे हॉस्पिटलमधील बेडची कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे
सदर ठिकाणी बोगीच्या आतील तापमान नियंत्रित राहावे यासाठी बाहेरून कुलर व बोगीच्या छतावर बारदान आच्छादित केल आहे व त्यावर स्प्रिंकलरने पाणी शिंपडलेेे जाईल याची व्यवस्था करण्यात आली आहे.