YouTube Video Carousel

जिल्हयात उद्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी

शासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधनंतरही लोकांमध्ये कुठल्याही प्रकारची  भीती अथवा  परिस्थिती चे गांभीर्य दिसत नाही, नाशिक मालेगाव  शहरासह जिल्ह्यात कोरोनाची
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच दहा लाख लोकसंख्येमागे संपूर्ण देशात नाशिक जिल्हा अव्वल स्थानी असल्याचे वृत्त आहे.

याची गंभीर दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्यामुळेच नाशकात कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा पालकमंत्री भुजबळ यांनी दिला आहे. यासाठीच आज सायंकाळी तातडीने कोरोना आढावा बैठक घेण्याचे पालकमंत्र्यांनी निश्चित केले आहे. या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा केली जाणार आहे.
Previous Post Next Post