कुकाणे (दिनेश पगारे )
जगात भारताची मान आदराने ऊंचावणारे विश्वरत्न डॉ. भीमराव रावजी आंबेडकर यांची 130 वी जयंती जिल्हा परीषद शाळा कुकाणे येथे सामाजिक अंतराचे पालन करत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन एन.पि.जगताप सर यांनी तर अनुमोदन सचिन पगारे सर यांनी केले,
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गौतम जगताप यांनी माहिती दिली.. सदर कार्यक्रमा प्रसंगी सौ.साधना सुरेश ब्राम्हणकार ,श्रीमती शीला नागोजी शिंदे,बाबासाहेब जगताप आदि उपस्थित होते.
