मालेगाव येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी रेमडीसिव्हर इंजेक्शन तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी नाशिक व अन्न व औषध प्रशासन याच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या चर्चेप्रमाणे व पाठपुराव्यामुळे मालेगाव महानगरपालिकेला आज रात्री ( 13 एप्रिल ) 500 रेमडीसिव्हर इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत.
आपली नवीन वितरण कार्यपद्धती आज पासून लागू करण्यात येत आहे.
या व्यवस्थेद्वारे गरजू व्यक्तीपर्यंत उपलब्धतेच्या प्रमाणात अत्यंत पारदर्शकरीत्या Remdisivir पोहोचवणे शक्य होईल.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे व या सर्व प्रक्रियेवर त्याचे थेट नियंत्रण राहिल.
- सूरज मांढरे
जिल्हाधिकारी
नाशिक