मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसारित करण्यात आलेल्या पोस्ट नुसार मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांना फोनवर विनंती केली आहे की महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉक डाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आवश्यक तेवढे सहकार्य मिळावे.