YouTube Video Carousel

डिपॉझिट घेतल्यास कारवाई आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

मुंबई : कोरोनाच्या संकटसमयी अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी डिपॉझिटची मागणी रुग्णालयांकडून सर्रासपणे केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे अनेक रुग्णांची अडचण होत होती. काहींना उपचार घेणेही कठीण जात होते. हीच गोष्ट लक्षात घेत खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. आरोग्यमंत्रांच्या या निर्णयामुळे अनेकांना उपचार घेणे सोपं होणार आहे. पत्रकारांशी ते बोलताना त्यांनी राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशावेळी खाजगी रुग्णालयाकडे रुग्णांना जावे लागते. मात्र तिथेही रुग्णांकडून भरमसाठ डिपॉझिट आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेणे हा अक्षम्य गुन्हा असून असे डिपॉझिट घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असे स्पष्ट केले.
Previous Post Next Post