मालेगाव (विशेष प्रतिनिधी) भारतातील वाढत्या कोरोना संक्रमनामुळे आरोग्य यंत्रणांवर पडलेला ताण, तसेच वाढत्या रुग्णसंखेमुळे मृत्यू दरात होणारी मोठ्या प्रमाणात वाढ सरकारची डोकेदुखी ठरली असल्याने, तसेच ऑक्सिजन व्हेंटलेटर, रेमेडेसीवीर इत्यादींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने शेवटी मोदींनी मोठा निर्णय घेत 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे. देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. सोबतच 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत त्यांना कोरोना लस दिली जात होती. 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आणि आता 1 मे पासून 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे.