YouTube Video Carousel

नाशिककरांना आता बाजारपेठेत जाण्यासाठी पैसे मोजावे लागणार जास्त वेळ थांबल्यास दंड ही होणार

नाशिक :- (दै. भ्रमर) शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात
घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिक शहरात थेट रस्त्यावर उतरून गर्दीच्या ठिकाणांना भेट दिली होती व नियमांचे पालन करण्यासाठी विनंती केली होती. नियम पाळले गेले नाही तर लॉकडऊन हा एकमेव पर्याय उरेल, असे ते म्हणाले होते. नाशिककरांना 8 दिवसांची मुदत देतानाच 2 एप्रिल रोजी बैठक घेऊन लॉकडाऊनबाबात निर्णय घेतला जाणार असेही त्यांनी नमूद केले होते. भुजबळ यांच्या या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे शिस्तीचा बडगा उगारला असून त्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे.

अशी आहे नियमावली:
* वाढत्या करोना संसर्गामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते केले बंद.

* बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये

प्रतिव्यक्ती आकारले जाणार. *एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारपेठेत थांबल्यास पाचशे रुपये दंड.

* नियम मोडल्यास मुंबई पोलीस कायदा 43 अन्वये कारवाई करणार.

* शालिमार, नवापुरा, बादशाही कॉर्नर येथे पोलिसांची बॅरिकेडिंग. महापालिकेचा प्रत्येक
पॉइंटवर टेंट असणार.

*बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडून पास दिले जाणार. पासधारकांनाच असेल प्रवेश.

*मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये हा निर्णय लागू.
Previous Post Next Post