YouTube Video Carousel

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंटझोनबाबत कडक अंमलबजावणी : जिल्हाधिकारी


*जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांची बैठक संपन्न*

*नाशिक, दि. 22 मार्च 2021 (जिमाका वृत्तसेवा):*

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने पॉझिटीव्ह रुग्णाच्या परिसरात कंटेनमेंटझोनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकित सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकित जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस उपायुक्त बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ.प्रविण अष्टीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, महापालिकेचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक श्रीनिवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कंटेनमेंटझोन जाहिर केला जाईल तेथील लोकांनी कोरोनाच्या सर्व मागदर्शकसूचनेच्या पालन करणे आवश्यक आहे. कंटेनमेंटझोनच्या अंमलबजावणीसाठी गेल्यावेळी प्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या परिसराचे मॅपिंग व बारकोडींग करण्यात येणार असल्याचे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्याधिकारी यांची सेवा घेण्यात येवून त्यांना टेस्टींग व ट्रॅकिंगचा दैनंदिन अहवाल त्यांनी सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिल्या.

*ग्रामीण भागातील दौरे करणार*
ज्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा तालुक्यात दौरे करुन आवश्यक आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात येईल. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहिम, बाधित क्षेत्रातील ग्रामीण पोलीस पथकाच्या कार्यवाही बाबत माहिती घेण्यात येणार आहे. 

एचआरसीटीसेटरला तपासण्या झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनासदृश्य रुग्ण आढळल्यास सेंटर चालकांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला कळवावे. तसेच यावेळी जिल्हाधिकारी यांनी यावेळी शहरातील व जिल्ह्यातील ऑस्क्सिजन पुरवठ्याची , जिल्ह्यातील लसीकरणाचाही आढावा घेतला. 

शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येतील. तसेच कंटेनमेंटझोनबाबत शहरात कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याचे, महानगरपालिका आयुकत कैलास जाधव यांनी सांगितले. 

Previous Post Next Post