YouTube Video Carousel

चांदवड जवळील राहुड घाटात एस.टी.बसने घेतला पेट.

प्रतिनिधी- दिनेश पगारे
नाशिक:मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ एसटी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली.  राहुड घाटात धावत्या एसटी बसने पेट घेतला असल्याची माहिती समोर येतेय. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाताना घटना घडली आहे.सदर बस ही मालेगाव डेपो ची असल्याचे समजत आहे.
आगीने बसचा पेट घेतल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. चालकाने तात्काळ बस थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानं जीवितहानी टळल. मात्र आगीत एसटी बसचं मोठं नुकसान झाले आहे. उच्च तापमानामुळे बसने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यात दलाला यश आले आहे. चांदवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Previous Post Next Post