दिनेश पगारे- मालेगाव लाईव न्यूज. लासलगांव :निफाड तालुक्याचा पूर्वभाग आणि विकास यांचं नात गेल्या कित्येक वर्षांपासून जुळलच नव्हत. निफाड आणि येवला विधानसभा मतदारसंघात विभाजन झाल्यामुळे "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी" अशीच काहीशी गत देवगाव गटाची विकासाच्या बाबत होती. राजकारण्यांनी दुर्लक्षित केलेल्या या भागातील जनतेच्या हाकेला साद देत अमृताताई पवार यांनी नेतृत्व स्वीकारले. त्यांनी देवगाव गटाची विकासाशी अशी नाळ जोडली की ती कोरोणा महामारीच्या प्रकोपातही भक्कम राहिली.
स्वयम् सिद्धता आणि आत्मनिर्भरता हा मूलमंत्र देत त्यांनी १९ गावांचा भाग प्रगतीच्या वाटेवर आणून आत्मनिर्भर केला आहे.
नदी आणि दोन कालवे हे वैशिष्ठ्य लाभलेल्या या भागातही पाणीटंचाई जाणवत होती. यावर मात करून हा भूभाग स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य होण्याआधीच चर आणि तळे यांच्या निर्मितीस आणि खोलीकरनाची कामे सुरू केली. शेतकरी विकासाचा मूलमंत्र म्हणजे दळणवळण सुविधांचा विकास यासाठी शिवार रस्ते आणि गावागावात जोडणारे रस्ते कधी स्वखर्चातून तर कधी शासकीय निधीतून निर्माण केले.
पूरपरिस्थिती असो अथवा दुष्काळ अशा कोणत्याही आपत्तीमध्ये शेतकऱ्यांसाठी बांधावर जाऊन मदत आणि पुनर्वसन कार्यात सहभाग
घेतला.
करंजी,देवगाव,धारणगाव,धानोरे, तामसवाडी, सारोळे येथे जनसुविधा अंतर्गत दशक्रिया विधी, स्मशानभूमी शेड उभारले. रुई,कोळगाव,देवगाव,महादेव नगर,धारणगाव,शिरवाडे येथील शाळांची दुरुस्ती करत पायाभूत शैक्षणिक सुविधा पुरविल्या.देवगाव मध्ये चौक सुशोभित करण्यासाठी पेव्हर ब्लॉक्स बसविले याशिवाय रुई, खेडलेझुंगे येथे सभागृह बांधले. काळाच्या पुढे चालत कोरोणा महामारीआधीच आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविला.खेडलेझुंगे,देवगाव,रुई, गाजरवाडी येथील उपकेद्रांची दुरुस्ती केली.शुद्ध पिण्याचे पाणी हा भेडसावणारा गंभीर प्रश्न सोविण्यासाठी कोळगाव, कानळद, धारनगाव, ब्राम्हणवाडे,महादेव नगर येथे जलशुध्दीकरण प्रकल्प सुरू केले.यासारख्या विविध विकासकामाची पायाभरणी करून आर्कि. अमृताताई पवार यांनी देवगाव गटाला आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प पूर्ण केला.
---------------------------------------
**अमृताताई पवार यांचे महत्वकांक्षी गटजोड प्रकल्प अंतर्गत प्रस्तावित रस्ते.**
नैताळे - धरणगाव- देवगाव.
नांदूरमध्यमेश्वर - सारोळेथडी.
देवगाव -कोळगाव.
देवगाव - कानळद.
सारोळे थडी,कोळगाव, खेडलेझुंगे गाव रस्ते.
----------------------------------------
