YouTube Video Carousel

पोलीस कॉन्स्टेबल बच्छाव यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव.

दिनेश पगारे-(दि.15ऑगस्ट) जायखेड़ा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रविराज बच्छाव यांना स्वातंत्र्य दिनानिम्मित रोटरी क्लब सटाणा, सक्षम पोलीस टाइम्स व साई सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत कोरोना योद्धा पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले.  रोटरी क्लब सटाणा, बागलाणच्या वतीने कोरोना योद्धांचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धांना आव्हाड साहेब ( न्यायाधीश सटाणा कोर्ट ),  तांबोळी साहेब ( न्यायाधीश सटाणा कोर्ट ) रोटरीचे अध्यक्ष योगेश अहिरे साहेब, सचिव सोनी साहेब, अॅड. यशवंत पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र तसेच ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सक्षम पोलीस टाइम्स, साई सावली फाउंडेशन, दैनिक लोकमंथन यांच्या संयुक्त विद्यमाणे प्रांत भांगरे, आमदार दिलीप बोरसे, पो. नि. गायकवाड, साई सावली फाउंडेशनचे प्रशांत कोठावदे,  दैनिक लोकमंथनचे संतोष जाधव यांच्या उपस्थिती जायखेडा पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस काॅस्टेबल रविराज बच्छाव यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविले. श्री. बच्छाव यांचे एकाच दिवशी दोन पुरस्कार मिळाल्याने त्यांचे ,मित्रपरिवार,  पोलीस, सामाजिक, तसेच राजकीय अश्या सर्वच  क्षेत्रातुन विशेष  कौतुक होत आहे.
Previous Post Next Post