YouTube Video Carousel

रोहित अहिरे ठरले 'त्यांच्यासाठी' देवदूत

         मालेगाव (दिनेश पगारे) महाराष्ट्रातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ( Osh State Medical University, Russia ) येथे होते त्यात १. अथर्व अनिल ततार ( सटाणा ता. बागलाण ) २. किर्ती चंद्रकांत रेनगाडे ( उपेंद्रनगर, नाशिक )  ३. उन्नती योगेश माधरेले ( जुने नाशिक ) ४.श्रेयश रसाळ ५. विश्वनाथ सपनार हे विद्यार्थी लाॅकडाऊन मुळे रशिया येथे अडकले होते परंतु त्यांना भारतात येण्यासाठी वंदे मातरम मिशन असल्यामुळे विमानसेवा कमी असुन त्यांना भारतात येण्यासाठी तिकीट उपलब्ध होत नव्हते, त्यामुळे अडचण तयार झाली. याबाबत झालेली सर्व अडचण बागलाण तालुक्यातील विद्यार्थी अथर्व ततार यांनी  रोहित अंबादासजी अहिरे यांना व्हाॅट्स अॅप काॅलच्या द्वारे कळवली त्यांनी तातडीने सगळी घटना समजुन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा करुन यावर काय उपाययोजना करता येईल ते ठरवले. त्याप्रमाणे सुप्रियाताई यांनी ट्वीटर तसेच फोन द्वारे Indian Embassy चे Dr. S.Jaishankar , Hardeep S Puri या अधिकार्यांशी संपर्क करुन त्यांना भारतात येण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे अखेरीस सर्व गोष्टी लक्षात घेऊन Bishkek, Kyrgyzstan ( Russia) येथे अडकलेल्या या विद्यार्थींना भारतात येण्यासाठी तिकीट उपलब्ध करुन दिले. त्यांनी केलेल्या या कामामुळे रोहित अहिरे हे नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या या कामामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.*
Previous Post Next Post