YouTube Video Carousel

पिता पुत्रीचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू

नामपूर (दिनेश सोमवंशी) ताहाराबाद येथील व्यावसायिक राहुल महाजन (३६) व त्यांची कन्या किट्टू (७) यांचा काल (दि.३०) रोजी ताहाराबाद नजीक वाकीनाल्याजवळ झालेल्या अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर या अपघातात त्यांचा पत्नी गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
   अंतापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी आपल्या दुचाकी वाहनावर निघालेल्या या परिवारावर काळाने घाला घातला, वाकी नाल्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ऍम्ब्युलन्स ने महाजन यांच्या दुचाकीस धडक दिल्याने हा अपघात झाला, ही धडक इतकी गंभीर होती की पिता-पुत्रीचा जागीच मृत्यू झाला, व महाजन यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले, 
   या बाबत जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले, 
   महाजन व त्यांच्या किट्टू या निरागस बलिकेच्या दुर्दैवी मृत्यू परिसरात शोककळा पसरली आहे.

दुचाकी सारख्या वाहनावर प्रवास करताना रस्ते व वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेट घातल्याने जीव वाचू शकतो..

Previous Post Next Post