महानगरपालिका व पोलीस प्रशासनास कारवाईचे निर्देश
मालेगाव, दि. 16 (जय योगेश पगारे ) :- शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रातील दुकाने काही निर्बंधासह सुरु करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. या क्षेत्रातील दुकाने सुरू करतांना ते शासनाच्या पी-1 व पी-2 नुसार दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख तथा अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिले आहेत.
महानगरपालिका व पोलीस प्रशासनामार्फत याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही श्री.निकम यांनी केले आहे. प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील दुकाने सम-विषम तारखेला सुरु असणे अपेक्षीत असतांना काही ठिकाणी या आदेशाचे पालन होतांना दिसून येत नाही. या दुकांनामध्ये खरेदी, विक्री करतांना चेहऱ्यावर मास्कचा वापर बंधनकारक असून नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. वाहतुकीसाठी देखील घातलेल्या निर्बंधाचे पालन होणे अपेक्षित असतांना त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. कोरोनामुक्तीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असतांना नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

शहरामध्ये कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी घालून दिलेले निर्बंध व सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास देण्यात आल्या आहेत. शहरातील व्यवहार सुरळीत राहण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व नागरिक व व्यावसायिकांनी पालन करावे. शासन निर्देशांचे व नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897 नुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी केले आहे.