आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणालाही छेडछाड करू देणार नाही, यासंदर्भात कोणालाही संभ्रम असण्याचं कारण नाही. भारताला शांती हवी आहे. पण जर भारताला संघर्षासाठी उकसवल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांत (India-China Border Dispute) जोरदार हिंसक झडप झाली. यात भारताचे जवळपास २० सैनिक शहीद झालेत. तर चीनलाही एवढेच मोठे नुकसान झाले आहे. भारताचे जे सैनिक शहीद झाले आहेत, त्यात कर्नल रँकच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. चीनचे तेवढेच सैनिक मारले गेले आहेत. यात कमांडिंग ऑफिरसचा समावेश आहे. या संघर्षात चीनलाही खूप नुकसान सहन करावं लागलं आहे.
1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.
दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे आणि मुत्सद्देगिरीच्या पातळीवर तो सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनबरोबर सुरू असलेल्या वादावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्व पक्षांचे प्रमुख आभासी बैठकीद्वारे यात सहभागी होणार आहेत. या विषयावर विरोधी पक्षांकडून सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची सतत मागणी होत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला .
दरम्यान, भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत. चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी दगा दिला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले.