YouTube Video Carousel

असा होता आठवडा :दि. ७ जून ते १३ जून २०२० या कालावधीत शासनाने कोरोना विषाणू संसर्ग या बाबत घेतलेल्या व इतर निर्णयांचा थोडक्यात गोषवारा

दि. ७ जून ते १३ जून २०२० या कालावधीत शासनाने कोरोना विषाणू संसर्ग या बाबत घेतलेल्या व इतर निर्णयांचा थोडक्यात गोषवारा
कोरोना युद्ध
७ जून २०२०
* महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ४६१ गुन्हे दाखल, २५० व्यक्तींना अटक.
* कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा ज्या यात्रेकरुंना यात्रा रद्द करावयाची असल्यास केंद्रीय हज समितीला ceo.hajcommittee@nic.in याईमेलद्वारे कळवल्यास, यात्रेकरुंनी भरलेली संपूर्ण रक्कम कोणत्याही कपातीशिवाय परत देण्याचा  केंद्रीय हज समितीचा निर्णय.
* आरोग्य विभागाकडून कोरोना संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर, ठळक मुद्दे- कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे घरी विलगीकरण, त्यासाठी संबंधित व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक, विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नाही. गृह विलगीकरणाठीचे मुद्दे - रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाला अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणे आवश्यक, ज्या रुग्णाला घरी विलगीकरण (आयसोलेशन) करायचे असेल त्याच्यासाठी तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गृह अलगीकरणाची (होम क्वारंटाइन) सोय असणे आवश्यक, या रुग्णांची २४ तास काळजी घेणारी व्यक्ती घरी असणे आवश्यक. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारे रुग्णालय यांच्यामध्ये दूरध्वनी आणि मोबाइलद्वार संपर्क असणे आवश्यक. काळजी घेणारी व्यक्ती आणि कुटुंबातील सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घेणे आवश्यक. मोबाइलवर आरोग्य सेतू कार्यान्वित असणे आवश्यक. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास रुग्णाबाबत माहिती देणे अनिवार्य. गृह विलगीकरण कालावधी - विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसांनंतर. मागील १० दिवसांपासून ताप येत नसल्या संबंधित व्यक्तीची गृह विलगीकरणातून मुक्तता.
* १५ मे २०२० ते ७ जून २०२० या काळात १० लाख ७८  हजार १२१  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा, मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७,७१० अनुज्ञप्ती सुरू, २४ मार्च २०२० पासून राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी कारवाई, ७ जून २०२० पर्यंत ७४५२ गुन्ह्यांची नोंद, ३४५०आरोपींना अटक, ६७५ वाहने जप्त, १८ कोटी ९९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त,
* १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४. कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के), ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाइन, संस्थात्मक  क्वारंटाइन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध, सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन, ९१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद.
8 जून 2020
* मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत कृषी खरीप हंगाम कामे, बी बियाणे, खते, किटकनाशके, पीक कर्ज वाटप,  कापूस, तूर व धान खरेदी बाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा. महत्वाचे मुद्दे- खरीप हंगामासाठी ४० लाख मेट्रिक टन युरिया पुरवठ्यास केंद्राकडून मंजुरी, याशिवाय ५० हजार मेट्रिक टन युरियाच्या संरक्षित साठ्याचे नियोजन,  खते व बी बियाणे बांधावर पुरविण्यासाठी ४७ हजार ८९ शेतकरी गटांमार्फत  १ लाख  ५५ हजार ७५५ मेट्रिक टन खत, ८६ हजार १२६ मेट्रिक टन बियाणे , १ लाख ८० हजार ४८१ कापूस बियाणे पाकिटे बांधावर वाटप, ५ लाख २७ हजार ४८३ शेतकऱ्यांना लाभ. ३८१ लक्ष क्विंटल कापूस खरेदी, १८.८१ लाख क्विंटल  तूर खरेदी, २ लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी, ८२२ कोटी रुपयांचे  चुकारे उपलब्ध, १८.९० लाख क्विंटल चणा खरेदी, पीक कर्ज वाटपाला गती देण्याचे बँकांना निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण ४६ टक्के, तर राष्ट्रीयकृत बँकांकडून ७ टक्के पीक कर्ज वाटप, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून ६२५० कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांकडून २३०० कोटी रुपये पीक कर्ज वाटप.
* वंदेभारत अभियानांतर्गत ४७ फ्लाईटसद्वारे ६७९५ नागरिकांचे विविध देशातून महाराष्ट्रात आगमन, यामध्ये २१०७ प्रवासी मुंबईचे, उर्वरित २४८३ प्रवासी महाराष्ट्राचे, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या २२०५,
* मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांच्या हस्ते डबेवाल्यांना  २,५०० रेशन किटचे वितरण.
* महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ४६२  गुन्हे दाखल, २५४ व्यक्तींना अटक.
* कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी पोलिसांमार्फत ४ लाख ६० हजार पास वाटप, ५ लाख ८६ हजार व्यक्ती  क्वारंटाइन, ६ कोटी ७८ लाखांचा दंड.
* रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून १६६१ रुग्णांची  घरी रवानगी, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५, कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार, १०९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद.
9 जून 2020
* लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला व आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात १४०३ रुग्णांकडू लाभ. या सेवेसाठीचे मोबाइल ॲप आठवडाभरात कार्यान्वित होणार, एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू. www.esanjeevaniopd.in ( http://www.esanjeevaniopd.in/ )  या संकेतस्थळावर जाऊन या सुविधेचा लाभ घेता येणे शक्य. विविध जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण, ही मोफत ओपीडी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत उपलब्ध, रविवारी ही सेवा उपलब्ध नसते.
* एस.टीच्या ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरीत नागरिकांना रेल्वेस्टेशन तसेच त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत रवानगी, ३१ मे पर्यंत एस.टी बसेस मार्फत १५२.४२ लाख कि.मी चा प्रवास. त्यासाठी शासनामार्फत  १०४.८९ कोटी रुपयांचा खर्च. २ लाखाहून अधिक श्रमिकांना लोकांना रेल्वे स्टेशनवर पोहोचवले. ३ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले.
* विषाणू प्रयोग शाळेचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ई-लोकार्पण, रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देण्याचे श्री ठाकरे यांचे सूतोवाच. रत्नागिरी  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 कोटी 7 लाख रुपये खर्च करुन या विषाणू प्रयोगशाळेची 14 दिवसात उभारणी. या प्रयोगशाळेमुळे कोव्हीड, एच.आय.व्ही, जेनेटिक ओळख कर्करोगाच्या चाचण्या शक्य.
* लॉकडाऊन  सुरु झाल्यापासून ८ जूनपर्यंत  कलम १८८अंतर्गत १,२४,१०३ गुन्ह्यांमध्ये २३,९२५ व्यक्तींना अटक,  या गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ८१ हजार १९१ रुपयांचा दंड, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल,८४,५१७ वाहने जप्त.
* ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याची कार्यवाही सुरु.
* वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट चालू आर्थिक वर्षासाठी शिथील, ग्रामपंचाय कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले चांगले काम आणि लॉकडाऊनच्या काळात घटलेली करवसुली पाहता हा निर्णय घेण्यात आला.
* वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत नागरिकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसदर्भात मार्गदर्शक सूचना जारी, या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, गठित टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड-१९ ने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचा यासाठी आधार घेण्यात आला.
* १६६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ६३८, २२५९ नवीन रुग्णांचे निदान, ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरू,  आज १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद.
* महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ४६४  गुन्हे दाखल,  २५४ व्यक्तींना अटक.
10 जून 2020
* मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे, गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन.  कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही त्यामुळे सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही.
* मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्यामार्फत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा. ठळक मुद्दे-  मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी राज्यभर जाहीराती द्या. ज्या विभागात रोजगार उपलब्ध आहे त्याचा तपशील घेऊन जाहिराती केल्यास भूमीपुत्रांना रोजगाराची माहिती मिळेल, भूमिपुत्रांना या कामांसाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा, या विकासकामांमुळे पावसाळ्यात महानगरात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतल्याने आता त्यांच्यावर विसंबून न राहता विकास कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. सुरूवातीच्या काळात त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा, कौशल्य विकास विभागामार्फत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न आवश्यक, विकास कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा.
* दि. २२ जून २०२० पासून विधिमंडळाचे नियोजित पावसाळी अधिवेशन, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर आता दि. ३ ऑगस्ट २०२० पासून घेण्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय.
* महाराष्ट्र सायबर विभागामार्फत  सायबर संदर्भात ४६७ गुन्हे दाखल, २५५ व्यक्तींना अटक.
* पावसाळ्यापूर्वी कापूसखरेदी पूर्ण करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार असल्याची  उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची माहिती.2019-20 मध्ये उत्पादित 410 लाख क्विंटल कापसापैकी केंद्रीय कापूस महामंडळ आणि कापूस पणन महासंघामार्फत आतापर्यंत 188 लाख 17 हजार क्विंटल कापूस खरेदी, खाजगी व्यापाऱ्यांद्वारे 198 लाख क्विंटल कापूस खरेदी, त्यामुळे 386 लाख  17 हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण, एफएक्यू दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन.  
* दि.२२ मार्च ते ९ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,२४,३६९ गुन्ह्यांची नोंद, २३,९८६ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ८६ लाख ७४ हजार ६९१ रुपयांचा दंड,
* नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज तातडीने देण्याची विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस.
* कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि हॉटस्पॉट ओळखण्यासाठी 'आरोग्य सेतू' ॲपचा वापर कसा प्रभावी होऊ शकतो, यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे आणि कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद.
* आयसीआयसीआय व्हेंच्युअरचे कर्मचारी आणि कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये.
* १८७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५१७, कोरोनाच्या ३२५४ नवीन रुग्णांचे निदान, सध्या राज्यात ४६ हजार ७४ रुग्णांवर उपचार सुरू, आज १४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद, कोरोनामुळे मृत्यूंची संख्या ३४३८
११ जून २०२०
* दि.24 मार्च, 2020 पासून दि.10 जून 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात अवैध मद्यविक्री संदर्भात 7,772 गुन्ह्यांची नोंद, 3,618 आरोपींना अटक, 695  वाहने जप्त, 19 कोटी 50 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
* पोलीस विभागासाठी उपयुक्त, सेग-वे स्कूटरचे (सेल्फ बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन.  लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा श्री देशमुख यांचा विश्वास.
* विदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाच्या प्रयत्नांना यश, लवकरच विविध देशांतील १० गुंतवणुकदारांसोबत करार केले जाणार, अमेरिका, युरोप, जपान, कोरिया, तैवान आदी देशामधील गुंतवणुकदारांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची रिब्युट इंडस्ट्रियल सेक्टर- पोस्ट कोविड या विषयावरील वेबिनारमध्ये माहिती. ठळक मुद्दे- आतापर्यंत सुमारे ६० हजार उद्योग सुरू, झाले आहेत. त्यात १५ लाख कामगार रुजू , औद्योगिक कामगार ब्युरोची स्थापना, त्यासाठी वेबपोर्टल तयार, याद्वारे कुशल, अकुशल कामागारांची माहिती मिळणे सुलभ,जून महिन्याच्या शेवटी हा ब्यूरो कार्यान्वित होणार, कोविडमुळे अनेक कंपन्यातून कामगार त्यांच्या प्रातांत गेल्याने उद्योगांना भेडसावणारी कामगारांची समस्या दूर करण्यासाठी  ब्युरोचे सहाय्य, याद्वारे तरुणांची कुशल, अकुशल अशी वर्गवारी करून वेबपोर्टलद्वारे नोंदणी करणार, नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे यांचा या ब्युरोद्वारे  समन्वय.
*  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार, अन्य जिल्ह्यांमधून मुंबईत सेवा देण्यासाठी २०० ते ३०० डॉक्टर्स उपलब्ध होणार असल्याची,आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
* रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी भागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मदावली.
* वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८४६५ प्रवाशांचे आगमन
* सायबर संदर्भात ४७०  गुन्हे दाखल, २५५ व्यक्तींना अटक.
* दि. २२ मार्च ते १० जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,२६,१०० गुन्ह्यांची नोंद, २४,०३४ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ९७ लाख ६७ हजार ४११ रुपयांचा दंड.
* गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्याद्वारे  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कोरोना परिस्थिती विषयीचा आढावा बैठक. कोविड संदर्भातील कामाबद्दल श्री देशमुख यांच्याद्वारे समाधान. पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची अधिक काळजी तसेच पोलीस आयुक्तालयासाठी ड्रोन सुविधेसह आवश्यक सामग्री  घेण्याची सूचना.
* गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्याद्वारे नेरूळ येथे पोलिसांसाठी उभारलेल्या कोविड विलगीकरण कक्षाची पाहणी.
* नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कळंबोली येथे उभारण्यात आलेल्या ५० खाटांचे विशेष कोविड केअर सेंटरचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन.
* पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दीड महिन्यात उभारण्यात आलेल्या 450 रुग्णक्षमता असलेले समर्पित कोविड आरोग्य केंद्राचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत ऑनलाइन उदघाट. शासनाद्वारे या रुग्णालयासाठी 1 कोटी 32 लाख रुपयाचा निधी. या रुग्णालयात सौम्य व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार. या रुग्णालयासाठी लागणारे मनुष्यबळ व साधन सामुग्रीची तरतूद राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत करणार. सुविधा -           खाटांची क्षमता - 504, अतिदक्षता विभागामध्ये 10 बेड आणि 5  व्हेन्टीलेटरची सोय,  डीफेलटर मशीन - 5, ई.सी.जी. मशीन 1, ए.बी.जी. मशीन - 1 ,          रुग्णाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक वार्ड मध्ये एक टीव्ही, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, मासिके व वर्तमानपत्रांची व्यवस्था             रुग्णवाहिका - 2, सर्व रुग्णांना आहार सेवा.
12 जून 2020
* काही समाज माध्यमे व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या निराधार असून असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमानसात संभ्रम निर्माण करतात, त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या  पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. व्यवहार हळूहळू सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट.
* राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक ट्रकमध्ये रुपांतर करण्यास मान्यता, आतापर्यंत ७२  बसेस मालवाहतूकीसाठी तयार, एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक ट्रक कार्यरत, २१ मे पासून आतापर्यंत एस.टी ट्रक सेवेमार्फत ५४३ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार टन मालाची वाहतूक, त्यासाठी ९० हजार कि.मीचा प्रवास, त्यापोटी महामंडळाला २१ लाखांचे उत्पन्न प्राप्त.
* नवशक्ती दैनिकाचे सहाय्यक संपादक प्रकाश सावंत यांच्यामार्फत मातोश्री सुलोचना रामचंद्र सावंत यांच्या अंत्यसंस्कारानंतर, आईच्या स्मरणार्थ ११ हजार १११ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड खात्यात  जमा.
* लॉ        कडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ७४ हजार १०७ पासेस  पोलीस विभागामार्फत वितरित. ६ लाख १ हजार ६७२  व्यक्ती कॉरंटाइन, दि.२२ मार्च ते ११ जून  या कालावधीत  १,२७,८४६ गुन्ह्यांची नोंद, २५,७४१ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ९७ लाख ६७ हजार ४११ रुपयांचा दंड.
* महाराष्ट्र सायबर विभागामार्फत  सायबर संदर्भात ४७३  गुन्हे दाखल, २५६ व्यक्तींना अटक.
* महानगरपालिका पी - उत्तर विभागामध्ये कंटेंटमेंट झोन असणाऱ्या ठिकाणी 'स्क्रिनिंग' करण्यासाठी डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वीस पथक तयार, प्रत्येक इमारतीत व झोपडपट्ट्यांधील प्रत्येक घरामध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांची माहिती.
* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नसल्याने निकालासंदर्भांत सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास न ठेवण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन.
* राज्यात कोरोना चाचण्यांनी सव्वा सहा लाखांचा टप्पा गाठला, आतापर्यंत ४७ हजार ७९६ रुग्ण बरे होऊन घरी, ४९ हजार ६१६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू.
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद, ठळक मुद्दे - भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे त्याचे स्वागत, उद्योग-व्यवसाय-कृषी क्षेत्रात जोमाने काम करण्यासाठी आणखी निवृत्त अधिकारी पुढे आल्यास त्यांचे मार्गदर्शन घेणार, नव्या उद्योगांना निमंत्रित करताना आधीच्या उद्योगांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय श्रमिक राज्याबाहेर गेल्याने स्थानिकांना उद्योग, व्यवसाय, पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये सहभागी करून घेता येणे शक्य. कोरोनाने अनेक संधी निर्माण केल्या आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे वेगळे वैशिष्ट्य निर्माण करणे आवश्यक, कार्यपद्धतींत तत्परतेने बदल करुन प्राधान्यक्रम ठरविला पाहिजे. प्रत्येक भागाच्या बलस्थानाचा उपयोग आवश्यक, राज्याला नेमका फायदा देणाऱ्या गोष्टीत गुंतवणूक आणि अशा बाबींना प्रोत्साहन देणे आवश्यक, अधिकाऱ्यांच्या सूचना- सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योगांना संपूर्ण पाठबळ देण्याची गरज, राज्यातील लँड  बँक समृद्ध करणे, पायाभूत सुविधा, बांधकामे क्षेत्रे जोमाने सुरु करणे, जिल्हा उद्योग केंद्रांना अधिक कार्यतत्पर करणे, जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांना सहभागी करून घेऊन उद्योग वाढीची जबाबदारी टाकणे, विस्कळीत सेवा रुळावर आणणे, जिम, वेलनेस, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, हॉटेल्स या व्यवसायातील मनुष्यबळाला दुसऱ्या  क्षेत्रात संधी देणे, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे सुरु करून कोविडच्या नियमानुसार चालवणे, रेल्वे आणि बसेसमध्ये मर्यादित प्रवासी संख्या ठेवणे, त्यासाठी जबाबदारी निश्चित करणे, उद्योग मित्रांना प्रोत्साहित करणे, तंत्रज्ञान आणि ज्ञान यावर भर देणे, कृषीपणन क्षेत्राला उभारी देणे, आरोग्य क्षेत्राला बळकटी देणे, वर्क फ्रॉम होम आणि नव्या कार्य संस्कृतीला उत्तेजन देणे, गरीब व कमी उत्पन्न गटाच्या लोकसंख्येला समोर ठेऊन शहरांचे नियोजन करणे
13 जून, 2020
* राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये दर, रुग्णांच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये दर निश्चित करण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची घोषणा. देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नाही.  सध्या राज्यात ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत, आतापर्यंत ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांची तपासणी, त्यापैकी १ लाख १ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के), मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या .
* कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत ५६ हजार २१६ शेतकरी गटांमार्फत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते, १ लाख १८ हजार क्विंटल बियाण, ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा, ६ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना लाभ. तपशील- ठाणे विभाग- ६६६२ गटांच्या माध्यमातून ८६ हजार ७४८ शेतकऱ्यांना ४९९६ मेट्रीक टन खते आणि १० हजार २३० क्विंटल बियाणांचा पुरवठा. कोल्हापूर विभागात २७६६ गटामार्फत ४५ हजार १११ शेतकऱ्यांना १४ हजार ७४० मेट्रीक टन खत आणि ४९५७ क्विंटल बियाणांचा पुरवठा. नाशिक विभागात ८०३५ गटांच्या माध्यमातून १ लाख ४६ हजार २५२ शेतकऱ्यांना ३६ हजार ५७५ मेट्रीक टन खत व १४ हजार ५११ क्विंटल बियाणांचा पुरवठा. पुणे विभागात १८ हजार १८१ गटांमार्फत १ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांना १९ हजार १८१ मेट्रिक टन खत तर ६९१४ क्विंटल बियाणांचा पुरवठा.औरंगाबाद विभागात ३७१६ गटांमार्फत ६३ हजार ९६३ शेतकऱ्यांना ४२ हजार ५५९ मेट्रिक टन खत आणि ७४१९ क्विंटल बियाणांचा पुरवठा. लातूर विभागात ७९४९ गटामार्फत ८४ हजार ७७६ शेतकऱ्यांना ३८ हजार ५०१ मेट्रिक टन खते, १५ हजार २२८ क्विंटल बियाणांचा पुरवठा. अमरावती  विभागात ६२२१ गटांमार्फत ८९ हजार शेतकऱ्यांना ३१ हजार ४७४ मेट्रिक टन खत, ४५ हजार ५८५ क्विंटल बियाणांचा पुरवठा, नागपूर विभागात २६८६ गटांमार्फत ३० हजार ६६९ शेतकऱ्यांना ८४३१ मेट्रिक टन खते आणि १२ हजार ५९२ क्विंटल बियाणांचा पुरवठा.अमरावती विभागात सर्वाधिक ४३ हजार ६५५ कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा.
* महाराष्ट्र सायबर विभागामार्फत  सायबर संदर्भात ४७५  गुन्हे दाखल, २५६ व्यक्तींना अटक.
* १५५० रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४९ हजार ३४६,  ३४२७ नवीन रुग्णांचे निदान, ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ४१ हजार ४४१ नमुन्यांपैकी १ लाख ०४ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१६.३ टक्के), ५ लाख ८३ हजार ३०२ लोक होम क्वारंटाइन, १५८० संस्थात्मक क्वारंटान सुविधांमध्ये ७९ हजार ७४ खाटा उपलब्ध, सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज १३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद.
००००००
इतर घडामोडी,निर्णय
७ जून २०२०
* रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे वीज खंडीत झाल्याने बाधीत कुटुंबियांना मोफत केरोसीन वाटपाचा निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी असल्यास त्या जिल्ह्यांनाही केरोसीन पुरवठा करण्यात येणार असल्याची,अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. रायगड जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ३३५ इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका ५ लिटर केरोसीन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसीन मंजूर.
* निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा. ठळक मुद्दे - संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या  पाठीशी उभे, रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन निर्णय, हे पॅकेज नसून तातडीची मदत, अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज, नव्या सुधारित निकषाबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करण्याचे निर्देश. कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था, सिमेंटच्या पत्र्याला पर्याय, कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षित निवारे, यांचा विचार आवश्यक, नागरिकांना विश्वासात घेऊन पंचनामे.  निर्देश - मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा, पंचनामे तातडीने करा, ठप्प झालेले दळणवळण तातडीने सुरु करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले ते उभे करुन तातडीने वीज पुरवठा सुरु करा. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार, मच्छीमार यांना तातडीने मदत करा. वीज यंत्रणेतील पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांकडून तातडीने काम सुरु करा.
8 जून 2020
* मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित जागतिक बँकेच्या सहायाने राबविण्यात येणाऱ्या नॅशनल सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्ट, राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाची आढावा बैठक. ठळक मुद्दे- या अंतर्गत  397.97 कोटीची कामे  किनारपट्टीवरील  जिल्ह्यात सुरु, समुद्र किनाऱ्यांवरील जिल्ह्यांच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामास प्राधान्य द्या, रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, पालघर जिल्ह्यातील सातपाडी येथील 203.77 कोटींची कामे प्रगतीपथावर, नियोजित भूमिगत विद्युत वाहिनी कराराला वेळेत पुरस्कार देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य, त्यामुळे अतिरिक्त भूमिगत विद्युतवाहिन्यांची कामे करण्याकरिता 390 कोटी रुपयांना मान्यता, या प्रोजेक्ट अंतर्गत खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठीही 55.22 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यातील नारवेल बेनवलेसाठी 44.40 कोटी, कचली पिटकरी 10.82 कोटी, आपत्तीपूर्व प्रणाली साठी 53 कोटी रुपये, या प्रोजेक्ट अंतर्गत आपत्तीपूर्व प्रणालीची निविदा प्रकाशित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. किनारपट्टीच्या भागात 11 निवारे उभारणार.
* गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्याद्वारे पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर बंदोबस्तातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस साजरा.
9 जून 2020
मंत्रिमंडळ निर्णय
* कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील सर ज.जी. कला महाविद्यालय-मुंबई, सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय-मुंबई, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय-नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय-औरंगाबाद  शासकीय कला महाविद्यालयांसाठी अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यास मान्यता.
* पर्यावरण विभागाच्या नावात बदल करून ते आता पर्यावरण व वातावरणीय विभाग असे करण्यास मान्यता.
* वैवाहिक व कौटुंबिक वादाची प्रकरणे निकाली काढण्याकरिता कौटुंबिक न्यायालयांची असलेली आवश्यकता विचारात घेता लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद व परभणी येथे स्थापन करण्यात आलेल्या कौटुंबिक न्यायालयांना ज्या दिनांकास ती सुरू झालीत तेथून पुढे 5 वर्षाच्या कालावाधीसाठी  मंजूरी  देण्याचा निर्णय.
* महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व एमएसईबी सूत्रधारी कंपन्याद्धारे निधी उपलब्ध करण्याची गरज असून त्यासाठी एनटीपीसी, पीएफसी किंवा राष्ट्रीयकृत बँका आणि वित्तीय संस्था यांच्याशी करण्यात येणाऱ्या विविध करारास शासन हमी देण्याचा निर्णय. कमाल 20 हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल. लॉकडाऊननंतर औद्योगिक प्रक्रिया सुरु होऊन सुस्थितीत येण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका व इतर वित्तीय संस्थांकडून मध्यम मुदतीचे कर्ज घेतल्यास शासन हमीची गरज भासणार. यासाठी शासनाकडून आकारण्यात येणारे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय.
* वेंगुर्ला तालुक्यातील मौ. शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मे.इंडियन हॉटेल्स कंपनीला 54.40 हेक्टर जमीन 90 वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने देण्याचा निर्णय.
* रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्या, यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) श्री.बी.वेणूगोपाल; जालना जिल्ह्यासाठी सामाजिक न्यायव विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री.पराग जैन-नैनुटिया, परभणी जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागचे सचिव श्री.किशोरराजे निंबाळकर; अमरावती जिल्ह्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय.ए.कुंदन, मुंबई उपनगरासाठी सामान्यप्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती अंशु सिन्हा, गडचिरोली जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव आणि धुळे जिल्ह्यासाठी मराठी भाषा विभागाच्या सचिव श्रीमती प्राजक्ता वर्मा यांची पालक सचिव म्हणून नियुक्ती.
* बंधपत्रीत अधिपरिचारीकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्याची विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांची सूचना.
* मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्यामार्फत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा. ठळक मुद्दे - नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून संबंधित परिसरात सर्व सुविधा पुरवा, या महामार्गावर ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारा, उद्योग, कृषी, पर्यटन यानुसार भौगोलिक परिस्थितीनुरूप नियोजन करा, वस्त्रोद्योगाला अधिक चालना द्या. २४ जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा.
10 जून 2020
* मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा माध्यम प्रतिनिधींसोबद संवाद, ठळक मुद्दे-  निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित व्यक्तींना एनडीआरएफ आणि एस.डी.आर.एफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी  विशेष बाब म्हणून  निकषात बदल,  शासन खंबीरपणे  कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभे, वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु, तत्पूर्वी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि  सिंधुदुर्गला २५ कोटी रुपयांची मदत जाहीर, नुकसानभरपाईचे निकष बदलण्याबाबत संबंधित विभागांना सूचना, वीजपुरवठा सुरळित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा कापूस शासन खरेदी करणार, मका, तूर, चणाडाळ, धान याची खरेदी अन्न नागरी पुरवठा व पणन विभागाकडून खरेदी, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देणार.कोकणवासियांना पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण विभागामार्फत पक्की स्लॅबची घरे बांधण्यासाठी मदत, निसर्गवादळामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना खावटी कर्जापेक्षा खावटी अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या संबंधितांना सूचना. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून वीज पुरवठा सुरळित होईपर्यंत प्रति रेशनकार्ड ५ लिटर रॉकेल मोफत, रेशनदुकानातून तांदूळ तसेच इतर धान्य उपलब्ध करून देणार,
* निसर्ग चक्रीवादळाने बाधित कुटुंबांना नियमांपेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येत असल्याची उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची माहिती,घरांसाठी दीड लाख, तर शेतीसाठी हेक्टरी 50 हजारांची मदत.
* दलित समाजावरील अन्याय अत्याचार सहन केले जाणार नाहीत, दोषींविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिल्याची  गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.
११ जून २०२०
* एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे उपस्थित.
* ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्यिक, पत्रकारितेच्या चळवळीचा मार्गदर्शक, प्रेरणास्रोत  हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वामनराव तेलंग यांना श्रद्धांजली.
* साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन.
12 जून 2020
* भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत तयार केलेल्या एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई उद्घाटन. ठळक मुद्दे - मान्सून काळात एकात्मिक पूर इशारा यंत्रणा (इं‍टिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम) मुंबईसाठी वरदान ठरणार, जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पूर येणार, वादळासारख्या संकटाची पूर्व सूचना मिळून सावध होता येणे शक्य, या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या भागाती गटारे, नदी यामध्ये, रिअल टाइम होणारी पाण्याची हालचाल, प्रवाह याचे आडाखे बांधता येणे शक्य, मुंबईत ४ डॉपलर रडार लावण्याची प्रक्रिया सुरु, मान्सूनच्या आधीच रडार कार्यरत होणार.
* महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु.ल.देशपाडे यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे अभिवादन.
* बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे त्याचे कारण शोधण्याकरिता नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आल्याची वनमंत्री श्री संजय राठोड यांची माहिती.
* जागतीक बाल कामगार  विरोधी  दिना निमित्त कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्याद्वारे,बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्याची शपथ.
* आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांत इतर मागासवर्ग तसेच वि.जा.भ.ज.प्रवर्गाच्या प्रचलीत आरक्षणाची टक्केवारी व या प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन या संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, इतर सदस्य - गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी.



































Previous Post Next Post