YouTube Video Carousel

कोरोना योध्दांना सुरक्षा साधनांच्या वाटपासह उपाययोजनांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

मालेगाव, दि. 08 (जय योगेश पगारे ) : मालेगाव शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी निमा व होमिओपॅथिक संस्थेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्दांना कोविड-19 बाबत शासनाच्या उपाययोजनानुसार आवश्यक सुरक्षा साधनांचे वाटप आरोग्य प्रशासनामार्फत तज्ञ समितीच्या डॉ. श्रीराम गोसावी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
शहरातील आय.एम.ए. सभागृहात आयोजित कार्यक्रमात निमा मालेगाव शाखा व होमिओपॅथिक संस्थेच्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांना आज एन-95 मास्क, HCQs गोळ्यांसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे डॉ.गोविंद चौधरी, डॉ.हितेश महाले यांच्यासह निमा व होमिओपॅथिक संस्थेचे वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तज्ज्ञ समितीचे डॉ.श्रीराम गोसावी व डॉ.तुषार पवार यांनी आयुर्वेदिक व होमिओपॅथिकच्या खासगी डॉक्टरांना कोरोना-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. त्याच बरोबर Portable X-ray machine हे विना मूल्य MSG College व हज हाऊस येथे उपलब्ध आहे. या रुग्णालयात येणाऱ्या कोरोना-19 संशयित रुग्णांना स्वॅबसाठी  या.ना.जाधव हायस्कुल, एम.एस.जी.कॉलेज, हज हाऊस, जे.ए.टी.हायस्कुल येथे समुपदेशन करून पाठवावे. तसेच स्वॅब दिला त्यांना नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार त्यांना विलगीकरण अथवा अलगीकरन केले जाऊ शकते. सर्व डॉक्टरांनी रुग्ण तपासताना, काय काळजी घ्यावी ह्या बद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी निमा मालेगावचे पदाधिकारी डॉ. दीपक पाटील, डॉ. अतुल बच्छाव, डॉ. शेखर मगर. तसेच मालेगांव होमिओपॅथी असोसिएशन चे पदाधिकारी डॉ. संजय बेंडाळे, डॉ. सचिन बोरसे, डॉ. शिरुडे , डॉ पवार यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post