YouTube Video Carousel

मा. आ. डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाने नवीन नाशिक परिसरात ना नफा ना तोटा या तत्वावर माफक किराणा केंद्र सुरु...


 लोकडउनच्या काळामध्ये काही विक्रेत्यांनी मालाची साठवणूक करून ठेवत अवाजवी भावात किराणा विक्री करून नागरिकांना वेठीस धरले यामुळे सर्वसामान्य जनतेची मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक झाल्याचं लक्षात घेत हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्टकेले.





सिडको - जनसेवा हीच खरी सेवा याचे पालन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.आ.डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने नवीन नाशिक परिसरात ना नफा ना तोटा या तत्वावर माफक किराणा केंद्र सुरु करण्यात आले आहे.
"ना नफा ना तोटा" माफक किराणा केंद्राचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.आ.डॉ.अपूर्वभाऊ हिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षा डॉ.सौ.योगिता(वाहिनी) अपूर्व हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी मा.आ.डॉ.अपूर्व भाऊ हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक शहरात ना नफा ना तोटा या केंद्राच्या एकूण १७ शाखा सुरु करण्यात आले असल्याचं स्पष्ट केलं. लोकडउनच्या काळामध्ये काही विक्रेत्यांनी मालाची साठवणूक करून ठेवत अवाजवी भावात किराणा विक्री करून नागरिकांना वेठीस धरले यामुळे सर्वसामान्य जनतेची मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक झाल्याचं लक्षात घेत हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले 



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले व शहराध्यक्ष रंजनजी ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हि संकल्पना संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याचेही सांगितले. आरोग्य सेवा देणार, स्वास्थ कर्मचारी, पोलीस यंत्रना म्हणजेच कोरोना वोरीयर्स यांनी महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून आपणही समाजाला काही देणे लागतो या भावनेने या कामास सुरुवात केली असल्याचं नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षा डॉ.सौ.योगिता(वाहिनी) अपूर्व हिरे यांनी नमूद केले.
सदरील कार्यक्रम संपूर्ण सोशल डिस्टंसिंगचे पालन करून संपन्न करण्यात आला. प्रसंगी दीपकभाऊ सोनवणे, किरणभाऊ शिंदे, जिभाऊ बच्छाव, महेश भामरे, धनंजयमामा बुचडे, विशाल डोखे, जितूआब्बा जाधव, सुरेश बेंडकुळे, सुनील जगताप, दिलीप तुपे, मदन जमधाडे, कैलास खैरनार, मधुकर पगार, प्रल्हाद पवार, श्रीराम हिरे, पुरुषोत्तम वाराणसे, नारायण गायकवाड, बाबुलाल निकम, संतोष हारगोडे, सुधीर जाधव, बाजीराव पवार, संजय मोरे, संजय काकळीज, बाळासाहेब वाघ, रघुनाथ अमृतकर, कमलाकर चव्हाण, रमण तांबोळी, बोरसे बापूसाहेब, मनोज हिरे, मधुकर नंदन, नामदेव पवार, ज्ञानेश्वर वनसे, ज्ञानेश्वर पाटील, संजय सांगळे, विनायक क्षीरसाग
र, सुनील हिरे
Previous Post Next Post