YouTube Video Carousel

आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका खटल्याची सुनावणी करताना आरक्षणाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील वैद्यकीय कॉलेजात ओबीसींना ५० टक्के आरक्षण न देण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. यासह कोर्टाने तामिळनाडूमधील अनेक राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकाही फेटाळून लावल्या आहेत.
दरम्यान, आरक्षण हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, आपण सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घ्या आणि उच्च न्यायालयात दाखल करा, असं न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांनी सांगितलं. सर्व राजकीय पक्ष एकाच विषयावर एकत्र आले, याचा आम्हाला आनंद झाला आहे, परंतु आम्ही ही याचिका ऐकणार नाही. आम्ही ती याचिका फेटाळून लावत असलो तरी आपल्याला उच्च न्यायालयात दाद मागण्याची संधी देत ​​आहोत, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

Previous Post Next Post