कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नियमीत मास्क वापरा
: अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम
मालेगाव, दि. 10 (जय योगेश पगारे ) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनच्या आदेशातून मोठ्या प्रमाणात मोकळीक मिळाल्यानंतर शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) वगळता इतर भागातील व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नियमीतपणे चेहऱ्यावर मास्क, सुरक्षीत अंतर, सॅनिटायझरचा नियमीत वापर करावा असे आवाहन अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी केले आहे.
उपविभागीय दंडाधिकारी यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहेत. तथापी त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर यापुढे कठोर स्वरुपात कारवाई करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनास देण्यात आल्या असून नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नियमीतपणे चेहऱ्यावर मास्क वापरावा असे श्री.निकम यांनी कळविले आहे.
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत : अपर पोलीस अधिक्षक संदिप घुगे
कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या मालेगांव शहराचे सर्वच स्तरावरून कौतुक होत असतांना प्रतिबंधात्मक आदेशाचे योग्य पध्दतीने पालन होत नसल्याचे कालच्या कारवाई वरून दिसून येत असल्याचे अपर पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी कळविले आहे. दिनांक 9 जून रोजी एकाच दिवसात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन करणाऱ्या शहरातील 8 पोलीस ठाण्यांमध्ये 83 तर परिमंडळातील 18 पोलीस ठाण्यांमध्ये 158 गुन्ह्यांची नोंद झाली असून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजतागायत परिमंडळात 2844 तर शहरात 1691 गुन्ह्यांची नोंद झाल्याचेही त्यांनी कळविले आहे. प्रतिबंधात्मक आदेश हे सर्व नागरिकांच्या आरोग्याचे रक्षणासाठीच असून याचे गांभिर्य प्रत्येकाने ओळखले पाहिजे. शासनाने जरी नागरिकांना मोकळीक दिली असली तरी, प्रत्येक नागरिकाने सुरक्षीत अंतर व नियमीत मास्क वापरणे ही आपली नैतीक जबाबदारी समजून पार पाडावी असे आवाहनही श्री.घुगे यांनी केले आहे.