सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहणार.
साधारण अडीच महिन्याच्या काळानंतर मालेगाव शहरात टाळेबंदीतील सर्व नियमांचे काटेकोर पालन करून दुकाने आणि बाजारपेठा सुरू होत आहेत.
-:यासाठीचे आदेश पुढीलप्रमाणे:
क्रमांक 4 अन्वये केंद्र शासनने उपरोक्त वाचा क्रमांक 2 च्या कायद्याच्या कलम 10 (2)(1) अन्वये Phased Re-opening (Unlock1) चे आदेश पारित केलेले आहेत.
सदर आदेशाच्या अनुषंगाने उपरोक्त वाचा क्रमांक 5 अन्वये महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेन फेज टू (लागू दिनांक 5 जून, 2020) अन्वये राज्यातील प्रतिबंधित क्षेत्रां व्यतिरिक्त च्या क्षेत्रातील दुकाने व बाजार काही निबंधासह चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यात सदर दुकान अथवा बाजार चालू करताना ते P1-P2 या आधारावर चालू करण्याचे निश्चित केलेले असून, एकमेकां समोरील दुकाने ही सम व विषम तारखांना खुली राहतील याबाबत निर्देशित केलेले आहे.
सदर निर्देशांची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात करण्यासाठी आयुक्त महानगरपालिका यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले असल्याने मी आयुक्त मालेगाव महानगरपालिका यंबक कासार याद्वारे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
महानगरपालिकेच्या मालेगाव महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने अथवा बाजार दिनांक 5 जून 2020 पासून चालू राहतील.
दुकाने अथवा बाजारास सम-विषम तारखेचा नियम खालीलप्रमाणे पुढील आदेशापर्यंत लागू राहील.
अ) पूर्व-पश्चिम गली अथवा रस्त्याच्या दुतर्फा उत्तराभिमूख दुकाने सम तारखेला व दक्षिणाभिमूख दुकाने विषम तारखेला सुरू राहतील.
ब) दक्षिण-उत्तर गल्ली अथवा रस्त्याच्या दुतर्फा पूर्वाभिमुख दुकाने सम तारखेला व पश्चिमाभिमुख दुकाने विषम तारखला सुरू राहतील.
उक्त 'अ' व 'ब' बाबत काही शंका उपस्थित झाल्यास त्यावर संबंधित प्रभाग अधिकारी यांचा निर्णय अंतिम राहील.
त्यांना शासनाच्या सक्षम प्राधिकरणाकडून सदर दुकाने चालू करण्याचा परवाना प्राप्त असल्यास व ते शासनाचे सर्व नियम तंतोतंत पाळत असल्यास ते विहीत कालावधीत बंद करण्याचा कोणासही अधिकार असणार नाही.
संध्याकाळी 5 वाजे नंतर कोणतेही दुकान चालू राहणार नाही अथवा सकाळी 9 वाजेच्या आधी कोणतेही दुकान सुरू ठेवता येणार नाही.
दुकानांमध्ये सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील, महापालिका क्षेत्रात सर्वांना वस्तूंची विक्री अथवा खरेदी करताना मास्क बंधनकारक राहील, दुकानातील ट्रायल रूमचा वापर अनुझेय राहणार नाही.
दुकानांना एक्चेंज पॉलिसी लागू करता येणार नाही.
नागरिकांनी पायी चालण्याचा अथवा सायकलचा पर्याय वापरावा. यांत्रिक साधनांचा वापर टाळावा.
अनावश्यक खरेदीसाठी लांबच्या दुकानांचा पर्याय नागरिकांनी निवडू नये, शक्यते फक्त अत्यावश्यक खरेदीसाठीच फक्त घराबाहेर पडावे.
सामाजिक अंतराचे निकष डावलणा-या दुकानदाराचे दुकान महापालिकेकडून बंद करण्यात येईल.
वाहनातून प्रवास करताना खालीलप्रमाणे प्रवासी वाहनात असतील,
अ) टॅक्सी कैब आवश्यक एक अधिक दोन
ब) रिक्षा आवश्यक एक अधिक दोन
क) चारचाकी वाहन आवश्यक एक अधिक दोन
ड) दुचाकी वाहन फक्त आवश्यक एक सर्वांनी या आदेशाची नोंद घ्यावी.

