YouTube Video Carousel

कृषि पदवीधर संघटना मालेगाव तालुका नविन कार्यकारिणी नियुक्त

मालेगाव - राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या मालेगाव  तालुका विद्यार्थी उपाध्यक्ष पदी उदय नंदन खैरनार ,मालेगाव तालुका विद्यार्थी सचिव पदी सुरक्षा नंदलाल महाजन ,संघटक पदी धीरज राजेंद्र पटिल व अभिषेक संजय पटिल,सल्लागार पदी शुभम विक्रम पाटिल तर कार्याध्यक्ष पदी प्रमोद भाऊसाहेब धवडे यांची नियुक्ती करण्यात आली. हे सर्वजण एच.एच .श्री.श्री.मुरलीधर स्वामीजी कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर येथे शिक्षण घेत आहेत.कृषि पदवीधर संघटना ही राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी  साली 2012 कृषिभूषण महेश कडूस पाटील यांनी स्थापन केली असून गेल्या आठ वर्षांपासून अनेकविध आंदोलने व जनजागृती आणि उपक्रमांच्या माध्यमातून सरकार कडे मागण्या मान्य करुन घेणारी ही संघटना आहे. नुकतेच कृषि विद्यार्थी यांच्या परिक्षा मुल्यांकन तत्वावर घेऊन पुढील वर्षी करता प्रवेश द्या ही मागणी शासनाकडे पाठपुरावा करुन कृषि पदवीधर संघटनेने मान्य करुन घेतली. अशा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना संघटीत करण्यासाठी दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्या चे नवनिर्वाचित पदाधिकारी .यांनी सांगितले. विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुमित धामणे पाटील उपाध्यक्ष मनीष भदाणे पाटील, मालेगाव तालुका अध्यक्ष संकेत बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली
Previous Post Next Post