सतीश परदेशी | नाशिक (मालेगाव लाइव वृत्तसेवा )
दिंडोरी तालुक्यातील नागरीकांनी सहलीला बंदी असताना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या धोडंब किल्ला येथील सार्वजनिक ठिकाणी जाऊन पिकनिक केल्याचे प्रकरण संबधित लोकांच्या अंगलट आले आहे. मात्र किल्याच्या खालचा भाग चांदवड पोलीसांची हद्द किल्याचा वरचा भाग देवळा पोलीसांच्या हद्दीत तर पिकनिक करुन आलेले नागरीक वणीच्या हद्दीतील त्यामुळे कारवाई करायची कोणी? अशी स्थीती निर्माण झाल्याने स्वतंत्र अधिकारी चौकशी साठी नियुक्त करण्याची मागणी डाॕ आरती सिंह यांचेकडे करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सुमारे 25 ते 30 नागरीक दिनांक 26 मे रोजी चांदवड तालुक्यातील धोडंब किल्यावर पिकनिकसाठी गेले होते.पिकनिकचे फोटो स्टेटस् वर ठेवले व ते सोशल मिडीयावर व्हायरल झाले.जनमत न्युज चॕनलने याची दखल घेत वृत्त प्रकाशीत केले.सोशल मिडीयावर हे वृत्त सचित्र व्हायरल झाले.फिजीकल डिस्टन्स , चेहर्यावर मास्क नसणे, जमावबंदीचा आदेश झुगारणे , आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे व इतर नियमांचे तिनतेरा वाजवत जिल्हाधिकारी व शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबधितांचे धाबे दणाणले. मात्र राजकीय दरबारी दबदबा असलेल्या व्यक्ती वर कारवाईची वेळ आली तेव्हा हद्दीची बाब पुढे आली टाळाटाळ व वेळकाढुपणा यामुळे विषयाचे गांभीर्य कमी करण्याच्या भुमिकेमुळे पोलीस अधिक्षक डाॕ आरती सिंह यांचेकडे तक्रार करण्यात आली आहे.17 एप्रील 2020 रोजी परमोरी येथील स्वतःच्या फार्महाऊस मधे पिकनिक साजरी करणार्या नाशिकच्या काही लोकांवर कोविडच्या विविध 12 कलमान्वये वणी पोलीसांनी कारवाई केली होती. मात्र धोडंब किल्ला हा सार्वजनिक ठिकाणी असुन सहलीला बंदी असताना खुलेआम व राजरोसपणे हा प्रकार बेफीकीरी व राजकीय संरक्षणामुळे करण्यात आला असल्याची चर्चा आहे ही पिकनिक समुहात साजरी करणार्या एका शेठचा दबदबा राजकीय स्तरावर प्रशासनाच्या व्यवस्थेवर असल्याच्या चर्चेमुळे अद्याप या लोकांवर कारवाई करण्यासाठी थेट पोलीस अधिक्षक यांना साकडे घालण्यात आल्याने पुढील कारवाई कडे कायद्याचे पालन करणारांचे डोळे लागले आहेत.