राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आज महत्त्वाची माहिती दिली. “अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी देता येईल. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लिहून द्यावे, त्यांची परीक्षा घेतली जाईल. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा घेता येतील”, असं सामंत म्हणाले
अव्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांना हवी असल्यास ऐच्छिक परीक्षा घेतली जाईल, असं उदय सामंत यांनी नमूद केलंय.
बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत. तसंच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नाहीत अशी घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला निर्णय हा होता की मागील सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल जाहीर करावा. याचा अर्थ असा की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी तसं लेखी विद्यापीठाला द्यायचं आहे. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांनीही विद्यापीठाला लेखी द्यायचं आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत असंही सामंत यांनी म्हटलं आहे.