जिल्हयातील मालेगाव शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट असुन शहरात बंदोबस्त दरम्यान कर्तव्य बजावत असतांना पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना कारोनाची लागण झाली होती. कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना तात्काळ नाशिक येथील विविध रूणलयांमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारांती तब्बल १४४ कोरोना बाधीत पोलीसांनी कोरोनावर मात केलेली आहे.
कोरोनामुक्त झालेल्या पोलीस योध्दयांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे ७७ पोलीस, जालना एस.आर.पी.एफ.चे ३९ पोलीस, औरंगाबाद एस.आर. पी.एफ. चे १०, अमरावती एस.आर.पी.एफ.चे १२, मरोळ आणि धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे २ व जळगाव पोलीस दलातील ४ असे एकुण १४४ पोलीसांनी कोव्हीड १९ कोरोना आजारावर मात करून उपचाराअंती बरे झालेले आहेत. यातील काही पोलीस कर्मचारी या आजारातुन बरे होऊन पुन्हा कर्तव्यावर हजर देखील झालेले आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक मा. डॉ. आरती सिंह मॅडम यांनी कोरोना मुक्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केलेले आहे व त्यांना त्यांचे सहकारी तसेच नातेवाईक यांचेकडुन देखील शुभेच्छा येत आहेत.

