कोरोनाने आधीच त्रस्त असलेल्या महाराष्ट्रावर मध्य प्रदेशाकडून येणाऱ्या टोळधाडीचे संकट घोगवंत असून, येत्या काही दिवसात प्रदेशातील सीमेवरील सर्व जिल्ह्यानां टोळधाडीचा सामना करावा लागणार आहे, कृषी विभागाने तशी सतर्क राहण्याची सूचना सर्व शेतकऱ्यांना केली आहे,
सदर टोळधाड (नाकतोडयांचे थवे) दिवसा 14- 16 किमी प्रतितास वेगाने महाराष्ट्रात येत असून सायंकाळी विश्रांतीसाठी जमिनीवर येऊन मिळतील त्या झाडांचे हिरवे पाने फुले खाऊन टाकतात,त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाशी दोन हात करावे लागणार आहे, ही टोळधाड पळवून लावण्यासाठी पत्रे, डबे वाजविणे, मोठा आवाज करणे, फवारणी करणे महत्त्वाचे ठरेल.